| Dimensions | 21.5 × 13.5 cm |
|---|
डिजिटल मार्केटिंगचा श्रीगणेशा (Print)
डिजिटल मार्केटिंगचा श्रीगणेशा (Print)
Original price was: ₹120.00.₹80.00Current price is: ₹80.00.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल आयुधांचा वापर करून आपला उद्योग वाढवणे. एखाद्यासाठी उद्योग वाढवणे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले नाव पोहोचवणे असेल, एखाद्याला जास्तीत जास्त विक्री करायची असेल किंवा एखाद्याला डिजिटल साधनांवर आधारीतच एखादा उद्योग सुरू करायचा असेल. हे सर्व आपण डिजिटल मार्केटिंगद्वारे करू शकतो व तेही एकाच जागेवर बसून.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्या व्यवसायात आपण आधीच इतके गुंतलो आहोत, तर या डिजिटल मार्केटिंगसाठी वेळ कुठून देऊ? आपला प्रश्न अगदी योग्य आहे. डिजिटल मार्केटिंग करण्यात आपल्याला आपला वेळ द्यायचा नाहीये, तर या पुस्तकामार्फत आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा गाभा जाणून घ्यायचा आहे.
एकदा आपल्याला डिजिटल मार्केटिंग नावाची युद्धकला अवगत झाली की आपण कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेमार्फत आपल्या नियोजनाची अंमलबजावणी करून घेऊ शकाल.






