प्रमोशन
केवळ जाहिरात तयार करून विक्री होणार नाहीये, तर ही जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविल्याने विक्री होणार आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ही जाहिरात कशी पोहचवायची हे आता पाहू. आपला Partner ID जोडून Link कशी तयार करायची हे तुम्हाला माहित नसल्यास आधी या लिंक वर क्लिक करा: https://shop.udyojak.org/how-to-work-as-online-partner/
WhatsApp:
ही App आपण सर्वच जण वापरतो. त्यामुळे याचा वापर करून आपल्या ओळखीतल्या लोकांना उत्पादने विकणे सहज शक्य आहे. WhatsApp वर तीन प्रकारे प्रमोशन करता येते.
१. Personal Message
आपला Partner ID लावून तयार केलेली जाहिरात आपल्या ओळखीच्या संबंधित लोकांना पाठवून त्यांना ते उत्पादन विकू शकतो. ग्रुपवरील मेसेज आपल्या ओळखीच्या व्यक्तींना WhatsApp द्वारे पाठविण्यासाठी तो मेसेज कॉपी करावा. त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्ती ला तो मेसेज पाठवायचा आहे त्यांचे चॅट उघडून तिथे तो मेसेज पेस्ट करावा. किंवा ग्रुप मधील मेसेज सिलेक्ट करून फॉरवर्ड या बटनावर क्लिक करावे व ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याचे नाव निवडावे.
२. ग्रुप्स
आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तिंसोबत WhatsApp द्वारे बोलतोय. पण याशिवाय आपण काही ग्रुप्स मध्ये सुद्धा असतो. जसे मित्रांचा ग्रुप, नातेवाईकांचा ग्रुप, वगैरे. आपला Partner ID लावून तयार केलेली जाहिरात या ग्रुप्स वर पाठवूनही आपण विक्री करू शकतो. आपल्या जाहिरातीचा मेसेज वरील कृतीप्रमाणेच व्यक्तीं ऐवजी ग्रुप्स मध्ये पाठवायचा आहे.
३. स्टेटस
WhatsApp मध्ये आता आपल्या मित्रांसोबत एखादी लिंक, मेसेज अथवा फोटो चोवीस तासांसाठी शेअर करता येतो. यासाठी स्टेटस (Status) नावाचा भाग आपल्या WhatsApp मध्ये असतो. यात स्टेटस म्हणून उत्पादनांच्या जाहिराती आपण शेअर करू शकतो. यासाठी WhatsApp मध्ये Chats च्या बाजूला Status लिहिलेले दिसेल तिथे क्लिक करावे. त्यानंतर My Status वर क्लिक करून जाहिरात शेअर करावी.
Facebook:
सध्या उपलब्ध असलेल्या सोशल मीडियांमध्ये फेसबुक बरेच प्रसिद्ध आहे. फेसबुकचा वापर करून अनेक प्रकारे आपली उत्पादने विकता येतात. यातील सर्वात सोपे दोन पर्याय आपण पाहू. तुमच्याकडे जर फेसबुक App नसेल तर सर्वप्रथम ती डाउनलोड करून त्यावर तुमचे अकाउंट तयार करा.
१. Wall Post
फेसबुकवर ही App उघडल्यावर एक पान दिसते ज्यावर आपले Friends (फेसबुकवर ज्यांच्याशी आपण जोडले गेले आहोत) त्यांनी शेअर केलेले लेख, फोटोज, व्हिडीओज इत्यादी दिसते. आपणही आपली जाहिरात इथे शेअर करून विक्री करू शकतो. फेसबुक वॉल वर जाहिरातीचा मेसेज कसा शेअर करायचा हे जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ पहा:
२. स्टेटस
WhatsApp प्रमाणे फेसबुकवरही स्टेटस हा पर्याय असतो. तिथे आपली जाहिरात शेअर करण्यासाठी App मध्ये वर डाव्या बाजूला Add Story हा पर्याय असतो, तिथे क्लीक करून जाहिरात शेअर करावी
Instagram:
केवळ फोटोज व व्हिडीओज असलेले सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम. तुमच्याकडे जर इंस्टाग्राम App नसेल तर सर्वप्रथम ती डाउनलोड करून त्यावर तुमचे अकाउंट तयार करा. तुम्हाला मिळणाऱ्या जाहिरातींपैकी काही जाहिरातींमध्ये फोटो किंवा व्हिडीओ सुद्धा असतात. हे वापरून पुढील दोन प्रकारे आपण प्रमोशन करू शकतो.
१. पोस्ट
इंस्टाग्राम मध्ये तुम्ही केवळ फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करू शकता व यांना तपशील (description) म्हणून मेसेज लिहू शकता. इंस्टाग्राम इतरांपेक्षा बरेच वेगळे आहे कारण यात पोस्ट मध्ये लिंक शेअर केली तरी ती उघडत नाही. आपली लिंक उघडली नाही तर विक्री तरी कशी होणार ना!
या वर तोडगा म्हणजे आपण जेव्हा एखादा फोटो/ व्हिडीओ शेअर करतो तेव्हा त्यात असे लिहावे कि कुणाला अधिक माहिती हवी असल्यास मेसेज करावे. कारण इंस्टाग्रामच्या मेसेजमध्ये मात्र लिंक उघडते. त्यामुळे इच्छुक लोकांनी मेसेज केल्यावर त्यांना मेसेजला रिप्लाय म्हणून जाहिरात पाठवता येते. इंस्टाग्रामवर विविध जाहिराती कशा करायच्या यासाठी स्मार्ट उद्योजकचे इंस्टाग्राम अकाउंट पाहू शकता.
स्मार्ट उद्योजकचे अकाउंट: https://www.instagram.com/smart_udyojak/
२. स्टोरी
फेसबुक व WhatsApp प्रमाणेच इंस्टाग्राम वर सुद्धा चोवीस तास दिसणारी स्टोरी शेअर करता येते. यासाठी वरच्या दावता कोपऱ्यात असलेल्या आपल्या फोटोवर क्लिक करायचे आहे.