40.00

श्रीमंत होण्यासाठी चोखाळा एक तरी ‘पॅसिव्ह इनकम’चा मार्ग

आपण प्रत्यक्ष काम न करता जर पैसे कमावणार असू तर हे कोणाला आवडणार नाही? हे शक्य आहे तुम्ही पॅसिव्ह इन्कमचे मार्ग निर्माण केलेत तर! हे कळण्यासाठी प्रथम आपलयाला अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे उत्पन्नाचे दोन्ही प्रकार समजून घ्यावे लागतील. आपण नोकरी किंवा व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी होतो. तिथे कष्ट करतो आणि त्यातून उत्पन्न मिळवतो. हे आपले अ‍ॅक्टिव्ह उत्पन्न झाले. आपण प्रत्यक्ष सहभागी झाल्याशिवाय हे उत्पन्न निर्माण होणार नाही.

आपण कष्ट, मेहनत करून जो पैसा कमावतो त्यातून आपण आपले खर्च भागवतो आणि खर्च भागवून जी राशी उरते ती कुठे ना कुठे गुंतवतो. बँक मुदत ठेव, पोस्टाच्या योजना, म्युच्युअल फंड, कंपनी डिबेंचर, इक्‍विटी, सोने, जमीन, घर असे गुंतवणुकीचे विविध मार्ग आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा स्वत:च्या अभ्यासानुसार गुंतवणूक करून चांगला परतावा मिळतो.

साधारणपणे ज्या गुंतवणुकीत धोका जास्त, त्यात परतावा मिळण्याची शक्यता ही जास्त. अशा गुंतवणुकीतून मिळणार्‍या उत्पन्नाला ‘पोर्टफोलिओ इन्कम’ म्हणतात. ‘पोर्टफोलिओ इन्कम’ हेही एकप्रकारे पॅसिव्ह इन्कमच आहे, मात्र चांगले ‘पोर्टफोलिओ इन्कम’ असण्यासाठी गुंतवणूकही मोठीच करावी लागते. त्यामुळे अनेकांना उमेदीच्या काळात चांगला पोर्टफोलिओ उभा करणं जमत नाही.

पॅसिव्ह इन्कम ही बर्‍याच अंशी नवी संकल्पना आहे, असे म्हणायला हरकत नाही; कारण यासाठी उपलब्ध असलेले मार्ग हे अगदी नवीन व माहिती-तंत्रज्ञानाशी निगडीतच आहेत. तुम्ही एखादे काम एकदाच करता मात्र त्यातून तुम्हाला वारंवार उत्पन्न मिळत राहते. एकदा केलेल्या कामात तुम्हाला पुन्हा प्रत्यक्ष सहभागीही व्हावे लागत नाही, पण उत्पन्न जमा होत राहते, याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. तुम्ही एखादी क्रिकेट-फुटबॉल मॅच पाहताय किंवा समुद्र किनारी फिरताय तरीही तुमच्या खात्यात तुमचे पॅसिव्ह उत्पन्न जमा होत राहते.

पॅसिव्ह उत्पन्न कमवू शकाल अशा काही मार्गांची ओळख करून घेऊ ‘एप्रिल २०२१’च्या अंकात… त्यासाठी आजच हा अंक खरेदी करा.

SKU: 50 Category:

Additional information

Dimensions 21 × 28 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्मार्ट उद्योजक । एप्रिल २०२१ । प्रिंट मासिक”