Partnership

Online काम

१. आपला Partner ID

तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला WhatsApp वर एक मेसेज आला असेल. या मेसेजमध्ये तुमचा Partner ID अर्थात एक नंबर तुम्हाला दिला जातो. हा तुमचा Partner ID Dashboard (https://shop.udyojak.org/online-partnership-dashboard/) वर Login करून सुद्धा तुम्ही मिळवू शकता. हा ID लक्षात ठेवणे अनिवार्य आहे.

२. उत्पादने

shop.udyojak.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेली प्रोडक्ट्स तुम्हाला विकायची आहेत. प्रत्येक उत्पादनाची एक विशिष्ट लिंक असते. या लिंकचे प्रमुख तीन भाग असतात.

पहिला भाग: या भागात वेबसाईटचे नाव असते.

दुसरा भाग: या भागात उत्पादनाचे नाव किंवा कोड असतो.

तिसरा भाग: तिसऱ्या भागात आपला Partner ID असतो. WhatsApp ग्रुपवर ज्या जाहिराती येतात त्यात या भागाचा अर्धा भाग अर्थात /?partner= हे दिलेले असते. यातील = या चिन्हापुढे तुम्हाला तुमचा Partner ID जोडायचा आहे.

तुमचे सर्व कमिशन हे या Partner ID मध्ये जमा होत असल्याने तो योग्य असणे अनिवार्य आहे.

उदा. जर तुमचा Partner ID २२ असेल पण तुम्ही चुकून २ लिहिलात तर त्यातून होणाऱ्या विक्रीवरील कमिशन हे २ हा Partner ID असलेल्या व्यक्तीला मिळेल!

३. जाहिरात

आठवड्यातून दोन जाहिराती व एक लेख असे तुम्हाला WhatsApp ग्रुप वर मिळेल. प्रत्येक जाहिरातीच्या व लेखाच्या मेसेजमध्ये सर्वात शेवटी त्या उत्पादनाची लिंक दिलेली असेल. वर सांगितल्याप्रमाणे तीन भागांनी बनलेली हि लिंक असेल. या लिंक मध्ये सर्वात शेवटी = हे चिन्ह असेल. या चिन्हाच्या पुढे जागा न सोडता तुम्हाला तुमचा Partner ID जोडायचा आहे.

Partner ID जोडलात की तुमची जाहिरात प्रमोशन साठी पूर्ण तयार झाली.