‘स्मार्ट उद्योजक’ हे एक उद्योजकतेला चालना देणारे मासिक आहे. तरुणांना उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा आणि उद्योजकांसाठी विविध व्यावसायिक विषयांचे मार्गदर्शन या मासिकामध्ये केलेले असते. शैलेश राजपूत हे या मासिकाचे संपादक असून, मुंबईहून दर महिन्याला प्रिंट आणि डिजिटल अशा दोन आवृत्त्यांमध्ये हे प्रसिद्ध होते.

मासिकाचा नमुना अंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही आमचे प्रतिनिधी होऊन आपल्या कार्यक्षेत्रात मासिकाचे काम करू शकता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइनसुद्धा हे काम करू शकता. याच्या मोबदल्यात तुम्हाला आकर्षक कमीशन दिले जाते. सध्या ५०० हून अधिक प्रतिनिधी कार्यरत असून ते ऑनलाइन माध्यमातून ‘स्मार्ट उद्योजक’चे काम करत आहेत. आम्ही आमच्या प्रतिनिधींना आमचे खर्‍या अर्थाने भागीदार मानतो म्हणून त्यांचा उल्लेख ‘पार्टनर’ असा करतो.

तुम्हीसुद्धा तुमची नोकरी, व्यवसाय व इतर गोष्टी सांभाळून आमचे प्रतिनिधी होऊन काम करू शकता. याने आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात उद्योजकतेचा प्रसार करण्याच्या कार्यात तुमचे सहकार्य मिळेल व तुम्हीही चांगले पैसे कमवू शकाल.

प्रतिनिधी/पार्टनर होण्याची प्रक्रिया

  • खालील बटणावर जाऊन ₹१०० One Time नोंदणी शुल्क व जुजबी माहितीचा फॉर्म भरायचा आहे.
  • त्यानंतर WhatsApp द्वारे तुम्हाला तुमचा Partner ID दिला जाईल व तो वापरून हे काम कसे करायचे हेही तिथे सांगितले जाईल.

प्रतिनिधी / पार्टनर होण्यासाठी खालील बटणावर जाऊन ₹१०० One Time नोंदणी शुल्क भरा.


काही निवडक वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रतिनिधी / भागीदार म्हणून काय काम करावे लागेल?

स्मार्ट उद्योजक मासिकाबद्दल लोकांमध्ये जागृती करणे, त्यांना मासिकाचे वर्गणीदार करणे, आपला व्यवसाय मोठा करून इच्छित असलेल्या उद्योजकांना स्मार्ट उद्योजक मासिकात किंवा WhatsApp Newsletter मध्ये अगदी कमी खर्चात उपलब्ध असलेल्या जाहिरातींबद्दल माहिती देणे.

हे काम फक्त ऑनलाइनच करावे लागेल की प्रत्यक्ष लोकांना भेटूनही म्हणजे ऑफलाइनही करता येऊ शकेल?

तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. तुम्ही प्रतिनिधी म्हणून नोंद केल्यावर तुम्हाला प्रथम ऑनलाइनसाठी नोंदवून घेतले जाईल. ऑनलाइनसोबत तुम्ही ऑफलाइन म्हणजे थेट लोकांना भेटून काम करू इच्छित असाल, तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरून द्यावा लागेल व सोबत आपले आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटोही जोडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून डिजिटल ओळखपत्र ई-मेल केले जाईल. तुम्ही त्याचे प्रिंट काढून घेऊ शकता.

कमीशन कधी व कसे मिळेल?

महिन्याचे कमीशन पुढील महिन्यात १० ते २० तारखेदरम्यान NEFT द्वारे थेट तुमच्या बॅंकेत ट्रान्सफर केले जाते. यासाठी कमीशन कमीतकमी १०० झालेले असावे लागते. १०० हून कमी असलेले कमीशन पुढच्या महिन्याच्या खात्यात धरले जाते. तुमचे Bank Details तुम्हाला पहिले कमीशन ट्रान्सफर करताना आमच्याकडून मागून घेतले जाईल.

प्रतिनिधी / पार्टनर होण्यासाठी खालील बटणावर जाऊन ₹१०० One Time नोंदणी शुल्क भरा.