E-Commerce Portal of Smart Udyojak

‘स्मार्ट उद्योजक’च्या माध्यमातून ऑनलाइन ‘अॅफिलेट मार्केटिंग’ शिका आणि घरबसल्या पैसेही कमवा!

‘स्मार्ट उद्योजक’ या महाराष्ट्रव्यापी उद्योजकीय माध्यमसंस्थेसोबत

स्वत:चा “Affiliate Marketing” व्यवसाय सुरू करण्याची संधी

‘अॅफिलेट मार्केटिंग’ हा नव्याने उदयाला आलेला आणि खर्‍या अर्थाने एकविसाव्या शतकातील व्यवसाय आहे. घरातून किंवा कुठूनही फक्त इंटरनेट आणि संगणक किंवा लॅपटॉप असल्यावर तुम्ही कुठूनही ‘अॅफिलेट मार्केटिंग’ हा व्यवसाय करू शकता. ‘स्मार्ट उद्योजक’ याच्याही एक पाऊल पुढे निव्वळ हातात स्मार्टफोन घेऊन आणि व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या माध्यमांचा वापर करून फावल्या वेळात; म्हणजे विद्यार्थी असाल अभ्यासातून कंटाळा आला की विरंगुळा म्हणून, नोकरदार असाल तर प्रवासाच्या वेळात, गृहिणी असाल तर दुपारच्या फावल्या वेळात कुठूनही – कसेही – कोणीही ‘स्मार्ट उद्योजक’ची ‘अॅफिलेट मार्केटिंग’ करू शकतो व पैसे कमवू शकतो.

कामाचे स्वरूप :

  • ‘स्मार्ट उद्योजक’च्या ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये तुम्ही जोडले गेल्यावर तुमची एक अॅफिलेट लिंक (URL) तयार होईल. या लिंकचा तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत विविध डिजिटल माध्यमांतून प्रसार करायचा आहे. तुमची जर वेबसाइट किंवा ब्लॉग असेल, तर वेबसाइट किंवा ब्लॉगवर जाहिरात रूपात दिसण्यासाठी बॅनर्ससुद्धा उपलब्ध होतील, ज्यात ही लिंक असेल. या बॅनर्सवरून झालेली विक्री तुमच्या खात्यात धरली जाईल.
वेब बॅनर्स : अशाप्रकारे तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर तुम्हाला जाहिरातीच्या जागेत हे बॅनर्स घेता येतील.
  • तुमच्या अॅफिलेट लिंक (URL) द्वारे जेवढे ग्राहक shop.udyojak.org वरून काहीही खरेदी करतील, त्याचे प्रत्येकी कमीशन तुमच्या खात्यात जोडले जाईल. आठवड्याचे (सोमवार ते रविवार) तुमचे कमीशन पुढच्या आठवड्यात तुमच्या बॅंक खात्यात जमा केले जाईल. हे कमीशन रु. १०० असणे गरजेचे आहे. ते रु. १०० हून कमी असल्यास पुढील आठवड्याच्या कमीशनमध्ये ते जोडले जाईल.
  • हे काम करण्यासाठी आम्ही WhatsApp द्वारे दैनंदिन टिप्स, मार्गदर्शन तसेच आवश्यक ते ते सहकार्यही देत राहू.
  • घरून किंवा कुठूनही तुम्ही हे काम करू शकता. अगदी प्रवासात हातात मोबाइल घेऊनसुद्धा हे काम करता येते. दिवसा एक ते दोन तास हे काम करून तुम्ही महिना ३,००० ते ५,००० रुपये सहज कमवू शकता.
  • स्मार्ट उद्योजकच्या विविध प्रॉडक्ट्सवर १५% ते ५०% पर्यंत कमीशन मिळवून तुम्ही महिन्याला नक्कीच चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Join Now

‘स्मार्ट उद्योजक’चे अॅफिलेट होण्याची प्रक्रिया :

  • ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये जोडले जाण्यासाठी तुम्हाला रु. १०० Joining Fee भरावी लागेल.
  • Joining Fee भरल्यानंतर ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये रजिस्टर होण्याचा पेजवर redirect व्हाल. तिथे ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये रजिस्टर होण्याचा online form भरायचा आहे.
  • हा फॉर्म आम्ही तपासून पुढील दोन दिवसांत त्याला स्विकृती देऊ. अर्ज स्विकृतीनंतर तुम्ही ‘स्मार्ट उद्योजक’चे अॅफिलेट म्हणून जोडले जाता.
  • Joining Fee भरल्यानंतर पुढील सर्व सूचना तुम्हाला आमच्याकडून whatsApp वर दिल्या जातात. तसेच कोणतीही अडचण आली तरी whatsApp व फोनवर सहकार्यही केलं जातं.
  • त्यापुढील प्रशिक्षण आपल्याला येथेच वेबसाइटवर मिळते. काही समजण्यात अडचण आली तर फोनद्वारे सहकार्य केले जाते.

Join Now

Help-Desk