Small Business

बुडत चाललेल्या उद्योगाला वर कसे आणायचे?

बुडत चाललेल्या उद्योगाला वर कसे आणायचे?
आपल्याला कधी असं वाटलंय का?
आपला उद्योग आता बंद करून टाकूया!
कितीतरी काळ त्यातून काहीच नफा मिळत नाहीये!
याशिवाय कोणतीतरी नोकरी किंवा इतर कोणतातरी उद्योग करू!

जर असं वाटलं असेल तर असा विचार करणारे आपण काही एकटेच नाही आहात आणि सगळं सोडून देणं हा काही योग्य मार्ग नाही.

आज आपण जे कोणते मोठ-मोठे उद्योग पाहतो, ते सर्वच या परिस्थितीतून गेले आहेत. विक्री जवळपास शून्यात जमा झाली आहे, उद्योग आणखी कर्जबाजारी होत चालला आहे, लिलाव करू इच्छिणारे लोक आपल्या दारात येऊन उभे आहेत आणि आपला उद्योग आता कर्जबाजारी होण्याकडे जाणारा मार्ग वाटत आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का, की या सर्वांतून ते यशस्वी उद्योजक कसे बाहेर पडले?

अगदी सोपे आहे.

त्यांनी कधीही हार मानली नाही आणि पळवाट तर आजिबात काढली नाही; ते प्रयत्न करत राहिले.

आपण कष्ट करून उभ्या केलेल्या उद्योगाला उतरती कळा लागलेली पाहताना आपल्याला नक्कीच खूप वाईट वाटत असणार हे साहजिक आहे. परंतु अशाच काळात बहुतांश उद्योजक भावनेच्या भरात येऊन चुकीचा निर्णय घेतात. आपल्या उद्योगाला परत वर आणण्यासाठी आपल्याला सामान्य गोष्टींपेक्षा नक्कीच काहीतरी जास्त करायला लागणार आहे. त्यामुळे आपला उद्योग पुन्हा रुळावर आणण्याचे मार्ग आता आपण पाहू.

नवनवीन गोष्टींचा विचार करा (Innovate)

उद्योजकांनो, एक लक्षात घ्या. या जगात स्थिर काहीच नसते. व्यक्ती, त्यांच्या आवडी-निवडी, टेक्नॉलॉजि असे सर्वच बदलत असते. आज जर एखाद्या गोष्टीला खूप भाव मिळत असेल तर भविष्यात तो मिळेलच असे नाही. त्यामुळे आपल्या उद्योगानेसुद्धा काळाच्या बदलांनुसार वागले पाहिजे.

केवळ आजचा विचार करणे आणि भविष्यात काय होणार आहे याकडे दुर्लक्ष करणे हे मोठ-मोठ्या कंपन्यांना नुकसान करून गेले आहे. याचमुळे तर एकेकाळी आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम असलेले कोडक, सोनी, मोटोरोला आणि याहू सारखे उद्योग आपली जागा हरवून बसले आहेत. विशेषज्ञ याला ‘स्ट्रॅटेजीक ट्रॅप’ अर्थात योजनेतील चुकांमुळे आपण ज्यात अडकतो ते जाळे असे संबोधतात.

याशिवाय एका मानसिक गुंतागुंतीतसुद्धा उद्योजक अडकतात आणि ती म्हणजे बहुतेक उद्योजक केवळ एखाद्या उद्योगाच्या यशाची कारणे पाहून त्यानुसार आपला उद्योग करायला जातात परंतु दरम्यानच्या काळातील अनेक बदलांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. याशिवाय उद्योगात जे पैसे येतात ते योग्य व गरजेच्या ठिकाणी न वापरता इतर ठिकाणी वापरल्यामुळे सुद्धा बरेच उद्योग बंद पडतात.

सरळ सोपे आहे.

जर एखाद्या उद्योगाने काळानुसार आपल्यात बदल केले नाहीत तर तो उद्योग अयशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढते . अनेक मोठ-मोठ्या उद्योगांच्या उदाहरणांतून आपण हे आणि इतर बरेच काही शिकू शकतो. जर अनेक कोटींचा नफा कामावणारी कंपनी सुद्धा बदल न स्वीकारल्यामुळे बंद/ मागे पडू शकते तर छोट्या उद्योगांवर याचा किती प्रभाव पडत असेल! लगेच आपल्याला याची सवय होईल असे नाही. परंतु आपण केलेल्या चुका आणि इतर कंपन्यांच्या अभ्यासावरून काढलेल्या त्यांच्या चुका लक्षात ठेवा आणि आपण त्या पुन्हा करणे टाळा.

आपल्या उद्योगात बदल घडवून आणा, नवीन उत्पादने आणि सेवा तयार करा, आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व काम स्वतःच्या अंगावर ओढवून घेण्याऐवजी आपली टीम, आपले उद्योगातील गुरू, परिवार यांची मदत घ्या. त्या सर्वांना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी कल्पना विचारा. त्यातील उत्तम कल्पनांचा विचार करा आणि लगेच अमलात आणा.

मार्केटिंगचा नवीन आराखडा तयार करा

मार्केटिंग अशी प्रक्रिया आहे जी एकतर आपला व्यवसाय प्रचंड वाढवू शकते किंवा आपला व्यवसाय बुडण्याचे कारण ठरू शकते.

आपल्या आधीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीने आपल्याला साथ दिली होती का? नसेल, तर पहिली ती सुधारण्याची आपल्याला गरज आहे.

मेलिंडा एमर्सन या लघुउद्योगातील तज्ज्ञांनुसार मार्केटिंगच्या उत्तम आराखड्यात पुढील गोष्टी असतात:

  • मार्केट रिसर्च
  • टार्गेट मार्केट
  • योग्य ठिकाण
  • स्पर्धात्मक विश्लेषण
  • मार्केट स्ट्रॅटेजी
  • बजेट

केवळ ₹२५० मध्ये तुमचा #Brand पोहचवा २०,०००+ लोकांपर्यंत!
Know More: Ad in WhatsApp Updates


यातील प्रत्येक गोष्ट कमी-अधिक प्रमाणात एखाद्या उद्योगाच्या यश-अपयशात कारणीभूत ठरत असते. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या ग्राहकांची अचूक ओळख. योग्य ग्राहकांना ओळखण्यासाठी त्यांच्या आवडी निवडी जाणून घ्या. यासाठी तुम्ही त्यांच्याशी फोनवरून किंवा इंटरनेट व सोशल मीडियाद्वारे थेट संपर्क साधू शकता. आपल्या उत्पादनाबद्दल त्यांना त्यांची मते विचारा व त्याचप्रमाणे त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील तर त्याही विचारा. विविध कल्पनात्मक मार्गांनी वैयक्तिक मार्केटिंगकडेसुद्धा लक्ष द्या.

आपल्या उद्योगासाठी एखादा उद्योग साथीदार आणण्याचा विचार करा

एका व्यक्तीपेक्षा दोन व्यक्ती नक्कीच उत्तम काम करू शकतात त्यामुळे अशा एखाद्या नवीन व्यक्तीला आपल्या उद्योगात आणा जो एक तर आपल्या उद्योगात गुंतवणूक करेल किंवा आपला उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला मदत करेल. नवीन व्यक्तीमुळे आपले नेटवर्किंगसुद्धा वाढेल. उद्योगात साथीदार आणण्यापूर्वी एका गोष्टीची काळजी घ्या की त्या व्यक्तीची स्वप्नं, ध्येयं आपल्या ध्येयांना पूरक असतील.

जोखीम पत्करा

फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी आपल्या भाषणात एकदा सांगितले होते, उद्योग अयशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जोखीम पत्करण्यास नकार देणे. जर आपल्याला प्रचंड यश हवे असेल, तर ते आपल्याकडे येण्याची वाट पाहत बसू नका, त्यासाठी आजच कामाला लागा!

उत्तम संधी शोधणं महत्त्वाचं आहे व त्यासाठी ती ओळखणं गरजेचं आहे.

ही संधी स्वतःहून आपल्याकडे येईल अशी वाट बघत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यासाठी आपल्यालाच जाऊन तिचा शोध घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपल्या रोजच्या कामातच ती दडलेली असते. त्यामुळे लक्षपूर्वक आपले काम करणे हासुद्धा उत्तम उपाय ठरू शकतो. उत्तम संधी सापडल्यावर काहीही विचार न करता खूप मोठी जोखीम पत्करणेही योग्य नाही तर आपल्या प्रत्येक निर्णयाचा प्रभाव कसा पडेल याचा अभ्यास करणेसुद्धा गरजेचे आहे.

छोट्या-छोट्या चॅलेंजेसनी आपण सुरुवात करू शकता.

जर यात आपण यशस्वी झालात तर आपला आत्मविश्वास वाढेल व जर गोष्टी बरोबर नाही झाल्या तर आपल्याला योग्य दिशा नक्कीच दिसेल. याशिवाय आपण जे कोणते काम हातात घ्याल ते अर्धवट सोडू नका. ते काम पूर्ण करेपर्यंत थांबू सुद्धा नका!

थोडक्यात,

उद्योगात चढ-उतार हे येणारच आणि कोणताच उद्योग कायम छान, उत्तम चालत नाही हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात घ्यायला हवे. अशीसुद्धा वेळ येईल की आपल्याला पूर्ण हरल्यासारखे वाटेल; त्यावेळी नवनवीन गोष्टींचा, कल्पनांचा विचार करा, नवीन भागीदार शोधा, आपला मार्केटिंगचा आराखडा पुन्हा तपासा आणि छोट्या-मोठ्या जोखिमा पत्करून उद्योगात पुढे जात राहा. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्ही खूप काही शिकाल, पुढे जाल, उद्योगात पुन्हा नफा मिळायला लागेल आणि खरे यश काय हे तुम्ही स्वतःच अनुभवाल.

– रॉबिन हावर्ड


‘स्मार्ट उद्योजक’ वाचा आणि उद्योजक व्हा!

शंभराहून अधिक व्यवसायांची माहिती असलेले ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’

हे ₹९९ चे ई-बुक या Lockdown काळात फक्त ₹३५ मध्ये उपलब्ध!!

अधिक माहितीसाठी : https://shop.udyojak.org/product/004/