Marketing

फेसबुक पेजचा वापर व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करावा?

फेसबुक पेजचा वापर व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करावा?

प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायांचे आजकाल फेसबुक पेज असते. त्यावर प्रत्येकजण नवनवीन पोस्ट्स, ऑफर्स, भरपूर लाईक्स मिळाल्याबद्दल धन्यवाद अश्या अनेक गोष्टी शेअर करतो.

परंतु खरंच फक्त इतक्यांनीच फेसबुकमधून बिझनेस मिळतो का?

कधीतरी एखाद्यानी चौकशी करून मिळतो..पण तितकाच!

फेसबुकचा बिझनेस साठी वापर कसा करता येतो..

  • आपल्या व्यवसायाचे पेज बनविणे
  • त्यात आपला लोगो प्रोफाइल फोटो म्हणून आणि आपल्या व्यवसायाची माहिती देणारे ग्राफिक कव्हर म्हणून ठेवावे
  • त्या पेजवरून रोज निदान १ माहितीपर आणि आठवड्यातून एक विक्रीची पोस्ट शेअर करावी
  • इतरांनी आपली पोस्ट वाचून लाईक करावी असे वाटत असेल तर आपल्या पर्सनल अकाउंट वरुनही ती पोस्ट लाईक आणि आपल्या पर्सनल ग्रुप्स मध्ये (त्या पोस्टच्या विषयाशी संबंधित) शेअर करावी.
  • कोणत्या प्रकारच्या पोस्टना रीच जास्त आहे तर कोणत्या प्रकारच्या पोस्ट्सना इंटरॅक्शन जास्त आहेत ते पहावे.
  • रीच जास्त म्हणून विक्री जास्त होईलच असे नाही परंतु इंटरॅक्शन जास्त असेल तर विक्री जास्त होऊ शकते.
  • इतर ग्रुप्स मधे विक्रीच्या गोष्टी सेल पोस्टरूपात शेअर कराव्यात तर माहितीपर पोस्टची लिंक शेअर करावी ज्यांनी आपल्या पेजवर येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढेल
  • ओळखीच्या लोकांना, ग्राहकांना आपल्या पेजवर रिव्ह्यू लिहायला सांगावे आणि ज्यांनी स्वतःहून रिव्ह्यू लिहिला आहे त्यांचे मेसेजमधून आभार मानावेत.
  • आपल्या ग्राहकांना आपल्या फेसबुक पेजला भेट द्यायला न विसरता सांगावे.
  • एखाद्या पोस्टवर चांगली किंवा वाईटपैकी (positive or negative) कोणतीही कमेंट आली तरी जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर त्याला रिप्लाय करावा.
  • एखाद्यानी मेसेज करून आपल्या उत्पादनांविषयी विचारले तर शक्य असल्यास त्यांचा फोन नंबर घेऊन फोनवर बोलावे; नाहीतर मेसेज मध्ये सव्विस्तर बोलावे.
  • मेसेज रीड करून वेळ मिळेल तेव्हा रिप्लाय करू असे म्हणून चालून आलेल्या ग्राहकाला गमावू नये.
  • आपले फेसबुक पेज लाईक केलेल्यांचा एक वेगळा ग्रुप बनवावा.

– शैवाली बर्वे
(shaivalibarve@gmail.com)


आपण कोणता व्यवसाय करतो हे किती लोकांना माहीत आहे?

आपण व्यवसाय करतो, त्याची जाहिरात करतो, तो व्यवसाय मोठा सुद्धा होतो. परंतु प्रत्येक व्यवसाय कुणाचा आहे हे किती लोकांना ठाऊक असते? मराठी उद्योजकांना ते कोणता व्यवसाय करतात, कुठे करतात अशी सर्व माहिती लोकांपर्यंत पोहचवता यावी यासाठी स्मार्ट उद्योजक तर्फे १,००,००० लोकांची उद्योजकसूची तयार होत आहे.

यात आपली नोंद का करावी?
★ यात तुमच्या नावाने स्मार्ट उद्योजकच्या पोर्टल वर एक वेबपेज बनेल
★ हे वेबपेज तुम्ही कुणालाही सहज पाठवू शकाल
★ पोर्टल वर इतर लेख वाचायला येणाऱ्या लोकांना तुमची ही नोंद दिसेल
★ तुम्हाला सोशल मीडिया शिवाय इतर online presence मिळेल

🎁 BONUS!
★ याशिवाय स्मार्ट उद्योजकच्या १,१०,००० हून अधिक फॉलोवर्स असलेल्या Facebook पेजवर तुमची ही नोंद share केली जाईल.

म्हणजेच तुम्ही कोणता व्यवसाय करता हे १,१०,०००+ लोकांना समजेल!

नोंदणी शुल्क : केवळ ₹२००

आताच तुमची नोंद या उद्योजकसूची मध्ये करा:
https://shop.udyojak.org/product/001/


Post Comment