प्रत्येक यशस्वी व्यवसायमागे एक उत्तम कल्पना, कष्टाळू उद्योजक आणि विश्वास ठेऊन पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार असतो. रतन टाटा ह्यांनी आजवर आपल्या खिशातील पैशांतून एकूण तीस स्टार्टअप्समधे गुंतवणूक केली आहे. ह्यांतील बहुतांश स्टार्टअप्स हे टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत. तसेच हे स्टार्टअप्स त्यांच्या कुवतीनुसार भरभरून यश मिळवणारे आहेत. ते आणखी मोठे व्हावे यासाठी रतन टाटांनी त्या स्टार्टअप्सची निवड केली.
GadgetNow च्या अहवालानुसार पुढील १० स्टार्टअप्स हे त्यांतील मुख्य आहेत :
१. पेटीएम
पे.टी.एम, भारतातील सर्वात मोठी मोबाईल वाँलेट सेवा पुरविणारी कंपनीआज सर्वोत्तम मोबाईल अप्लिकेशन्स मध्ये मोजली जाते. तिची निवड रतन टाटा यांनी केली. पे.टी.एमकडे नोव्हेंबर, २०१६ च्या नोटाबंदीमुळे एक भव्य संधी चालून आली. कारण पे.टी.एम द्वारे आपण एकही नोट न वापरता पैशांची कोड स्कॅन करून देवाणघेवाण करू शकतो. पेटीएमचे कष्टांतून उभे राहणारे उज्वल भविष्य ओळखून रतन टाटांनी त्यांत गुंतवणूक केली.
२. ओला कॅब्स
भाविष अगरवाल याने चालू केलेली ओला भारतातील लोकांना एक बटन दाबताच टॅक्सी उपलब्ध करून देते. टॅक्सी चालकांकडून काही प्रमाणात कमिशन घेऊन ओला आपला नफा कमावते. नुसतीच टॅक्सी नाही तर रिक्षा पासून लक्झरी गाड्यांपर्यंत आणि ५ मिनिटांच्या प्रवासापासून काही दिवसांच्या सहलींपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा ओला पुरवते.
३. झिओमी
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल परंतु झिओमी या कंपनीमध्ये गुंतवणूक करणारे रतन टाटा हे पहिलेच व्यक्ती! तसेच चायना मधील या कंपनीत रतन टाटांनी नक्की किती गुंतवणूक केली हे आजून कुणालाच ठाऊक नाही. झिओमी ही बीजिंग मधील एक टेक कंपनी आहे जी तिच्या स्वस्तातील मोबाईल्स साठी प्रसिद्ध आहे. भारतात या कंपनीचे पाहिले उत्पादन हे २०१४ साली आले. आता ही कंपनी अनेक घड्याळांपासून स्मार्ट-बँड पर्यंत अनेक प्रकारची उत्पादने भारतात विकते.
४. स्नॅपडील
रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या टेक स्टार्टअप पैकी स्नॅपडील हा पहिला स्टार्टअप आहे. स्नॅपडील, ज्याला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठमोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते, त्यात रतन टाटा यांनी २०१४ मध्ये गुंतवणूक केली. तेव्हा त्यांची गुंतवणूक ही पाच करोड पेक्षाही लहान होती. टाटा ह्यांनी एकूण कंपनीच्या आवाक्यातील ०.१७% भाग घेतला होता असे म्हटले जाते.
५. झिवामे
झिवामे डॉट कॉम हा आणखी एक असा स्टार्टअप आहे ज्याला रतन टाटांच्या गुंतवणुकीचे पाठबळ मिळाले. २०११ मध्ये रीचा कर आणि कपिल कारेकर यांनी सुरु केलेला हा स्टार्टअप काही विशिष्ट प्रकारचे कपडे विकणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. विविध युक्त्या लढवून केलेल्या कॅम्पेन्स मुळे हा स्टार्टअप प्रसिद्ध झाला आहे.
६. अर्बन लॅडर
रतन टाटा ह्यांनी अरबन लॅडर या बंगळूर मधील फर्निचर विकणाऱ्या प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे. अरबन लॅडर या कंपनीची ऍप आज भारतातील बारा शहरांत आपली उत्पादने विकते. टाटांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये अरबन लॅडर मध्ये गुंतवणूक केली असे सांगितले जाते.
७. कॅश करो
कॅशबॅक आणि कुपन्स ह्यांना भारतात अचानक प्रसिद्धी मिळू लागली. ह्यालाच आपली संधी मानून स्वाती आणि रोहन भार्गव यांनी गुरगाव मधून २०१३ साली कॅश करो सुरू केले. रतन टाटा ह्यांनी जानेवारी २०१६ मध्ये या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली तरी नक्की किती रक्कम गुंतवली हे कुणाला ठाऊक नाही.
८. अर्बन क्लॅप
डिसेंबर २०१५ मध्ये रतन टाटा ह्यांनी अरबन क्लॅप या घरांतील सुविधा पुरविणाऱ्या ऍप मध्ये गुंतवणूक केली. या ऍप चा वापर ग्राहक घरी लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा जसे रंगकाम, सुतारकाम, प्लंबिंग, वगैरे बुक करण्यासाठी करतात.
९. लेन्सकार्ट
चष्मे, गॉगल्स, लेन्सेस अश्या वेगवेगळ्या डोळ्यांसंबंधीत उत्पादने बनविणाऱ्या लेन्सकार्ट डॉट कॉम या स्टार्टअप मध्ये सुद्धा रतन टाटा ह्यांनी एप्रिल २०१६ मध्ये गुंतवणूक केली आहे.
१०. कारदेखो
कारदेखो हा एक गाड्यांचा ऑनलाईन बाजार असून त्यावरुन लोक नवीन तसेच वापरलेल्या गाड्यांची खरेदी- विक्री करु शकतात. रतन टाटा ह्यांनी जयपूर मधील गिरनार सॉफ्ट या कंपनीत गुंतवणूक केली आहे ज्यात कारदेखो डॉट कॉम, बाईक देखो डॉट कॉम आणि प्राईस देखो डॉट कॉम यांचा समावेश होतो.
– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com
Hello sir
My business is manufacturing of duplex boxes
Mr.Ratan Tata is mastermind and down-to-earth person.I want to meet him.i want guidance from him for my business