गेल्या बऱ्याच काळात आपण पाहत आलो आहोत की अनेक उद्योजक काळानुसार आणि ग्राहकांनुसार वेगवेगळ्या प्रमोशनच्या पद्धती वापरत आहेत.
२०१९ मधे प्रचंड लोकप्रिय होत असलेली प्रमोशन पद्धत म्हणजे ग्राहकांना समाधानी आणि आनंदी ठेवणे.
आज भारतात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक मिळविण्याशिवाय आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. एखाद्या उद्योगातून खरेदी करताना ते कोणत्या सोयी-सुविधा पुरवतात हे आज सर्वच ग्राहक पाहू लागले आहेत. जर आपण त्यांना हव्या तशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो, तर हे समाधानी ग्राहक आपल्याला त्यांच्या खरेदीतून नफा देतात, शिवाय ते आपले मोफत विक्रेते सुद्धा होतात.
वर वर पाहता हे खूप साधे आणि सोपे वाटते. परंतु आज जर आपण ग्राहकांना नेमक्या कोणत्या सोयी-सुविधा अपेक्षित आहेत हे पाहायला गेलात तर आपल्याला असंख्य उत्तरे मिळतील ज्यांचा ना आपण कधी विचार केला असेल, ना त्या आपल्या बजेट मधे बसणाऱ्या असतील.
त्यामुळे आज आपण काही अशा गोष्टी पाहू ज्या कोणताही उद्योजक सहज अमलात आणून आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त आनंदी आणि समाधानी ठेऊ शकेल.
- आनंदाने आणि आपुलकीने स्वागत करणे
- प्रत्येक ग्राहकाकडे वैयक्तिक लक्ष देणे
- ग्राहकांच्या जास्तीत जास्त प्रश्नांचे निवारण करणे
- वारंवार/ सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सूची बनविणे (FAQs)
- ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे शंकांचे निरसन करणे
- वेळेच्या आधी उत्पादन पुरवणे
- आपली चूक झाली असेल तर त्यावर पांघरूण घालत बसण्यापेक्षा ती मान्य करणे
- छोटी वस्तू घेवोत आथवा मोठी, प्रत्येक ग्राहकाला समान दर्जा देणे
- सणांच्या दिवशी ग्राहकांना शुभेच्छा देणे
- जे ग्राहक आपल्याकडून पुन्हा खरेदी करतील त्यांना काही सवलती देणे
- आपल्या उद्योगाच्या विविध कार्यक्रमांत ग्राहकांना आवर्जून बोलावणे
- ग्राहकांच्या फोन कॉल्स ना उत्तर देणे आणि त्यांच्याशी आपुलकीने बोलणे
याप्रकारे आपल्या ग्राहक आणि उद्योगानुसार अनेक छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रत्येक ग्राहक आपल्याला किती महत्त्वाचा आहे हे जर आपण दाखवून देत राहिलात तर आजच्या स्पर्धेच्या युगात आपण नक्कीच इतरांच्या पुढे जाऊ शकाल.
– शैवाली बर्वे
(shaivalibarve@gmail.com)
आपण कोणता व्यवसाय करतो हे किती लोकांना माहीत आहे?
आपण व्यवसाय करतो, त्याची जाहिरात करतो, तो व्यवसाय मोठा सुद्धा होतो. परंतु प्रत्येक व्यवसाय कुणाचा आहे हे किती लोकांना ठाऊक असते? मराठी उद्योजकांना ते कोणता व्यवसाय करतात, कुठे करतात अशी सर्व माहिती लोकांपर्यंत पोहचवता यावी यासाठी स्मार्ट उद्योजक तर्फे १,००,००० लोकांची उद्योजकसूची तयार होत आहे.
यात आपली नोंद का करावी?
★ यात तुमच्या नावाने स्मार्ट उद्योजकच्या पोर्टल वर एक वेबपेज बनेल
★ हे वेबपेज तुम्ही कुणालाही सहज पाठवू शकाल
★ पोर्टल वर इतर लेख वाचायला येणाऱ्या लोकांना तुमची ही नोंद दिसेल
★ तुम्हाला सोशल मीडिया शिवाय इतर online presence मिळेल
BONUS!
★ याशिवाय स्मार्ट उद्योजकच्या १,१०,००० हून अधिक फॉलोवर्स असलेल्या Facebook पेजवर तुमची ही नोंद share केली जाईल.
म्हणजेच तुम्ही कोणता व्यवसाय करता हे १,१०,०००+ लोकांना समजेल!
नोंदणी शुल्क : केवळ ₹३००