Marketing

कोणताही लहानातला लहान उद्योजकही पेड प्रमोशन द्वारे व्यवसाय वाढवू शकतो

कोणताही लहानातला लहान उद्योजकही पेड प्रमोशन द्वारे व्यवसाय वाढवू शकतो

आपण डिजिटल मार्केटिंग जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो.आपल्या उत्पादनांची जलद विक्री होऊ लागते, आपले फॉलोवर्स वाढतात. परंतु कधी-तरी अशी एक वेळ येते जेव्हा आपले प्रयत्न तितकेच असतात; परंतु निकाल कमी कमी व्हायला लागतो. करण सुरुवातीला आपल्या जवळचे असे अनेक लोक असतात ज्यांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचलेला नसतो. परंतु आपल्याला सहज ज्यांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचवता येईल अशांपर्यंत तो पोहोचल्यावर आपल्याला दिसणाऱ्या परिणामांची संख्या कमी होते.

यावर एक पर्याय असा आहे की आपल्या ग्राहकांना काय आवडते, ते कोणकोणत्या प्रकारची इतर पेजेस फॉलो करतात अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यानुसार लोकांना टार्गेट करणे. परंतु यात वेळ व श्रम दोन्ही लागतात. याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया वेबसाईट आपल्याला पेड प्रमोशन करण्याचा पर्याय देतात, तो वापरणे. अगदी ₹६० प्रति दिवस पासून या प्रमोशनची सुरुवात होते.

पेड प्रमोशन द्वारे आपण योग्य लोकांना टार्गेट करू शकतो व ते लोक शोधण्याचे कामही सोशल मीडिया करते. आपण अनेक गोष्टी या पेड प्रमोशन द्वारे लोकांपर्यंत पोचवू शकतो. जसे, आपले एखादे उत्पादन विकत घेण्याची लिंक, एखाद्या नवीन उत्पादनाची माहिती, आपल्या वेबसाई वा ब्लॉगची लिंक याशिवाय आपल्या अकाउंट अथवा पेजच्या फॉलोवर्स वाढविण्यासाठी आपण आपले पेज सुद्धा जास्तीत जास्त लोकांपार्यंत पोहोचवू शकतो.


केवळ ₹२०० मध्ये तुमचा #Brand पोहचवा २०,०००+ लोकांपर्यंत!
Know More: Ad in WhatsApp Updates


पेड प्रमोशन करताना तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात.

१. ध्येय
आपण एखादे प्रमोशन कशासाठी करत आहोत हे आपल्या डोक्यात एकदम पक्के करावे. आपल्या वेबसाईटवरील ट्रॅफिक (भेट देणाऱ्या लोकांची संख्या) वाढविणे एखाद्याचे ध्येय असेल किंवा काहीही करून विक्री वाढविणे दे दुसऱ्याचे ध्येय असेल. यामुळे आपली जाहिरात किती यशस्वी झाली हे आपल्याला मोजता येते.

२. ROI
ROI अर्थात Return On Investment म्हणजे आपण किती खर्च केला व त्यातून आपल्याला किती फायदा झाला. हा फायदा आपल्या ध्येयावर अवलंबून असतो. आपले ध्येय जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहचविण्याचे असेल व आपण फार विक्री झाली नाही म्हणून माझे पैसे वाया गेले असे म्हणणे योग्य नाही.

३. टार्गेट ऑडियन्स
आपल्या ध्येयाप्रमाणे आपला Target Audience अर्थात ज्यांना आपली जाहिरात दिसायला हवी, तो ठरवावा. उदा., आपले पुण्यात हॉटेल आहे व चेन्नई मधल्या लोकांना आपली जाहिरात दिसत असेल तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही व आपले पैसेही फुकट जातात.

या तीन गोष्टींची काळजी घेऊन त्या नीट समजून घेऊन कोणताही लहानातला लहान उद्योजकही पेड प्रमोशन द्वारे व्यवसाय वाढवू शकतो.

Paid Promotion करायचे कसे?

विविध सोशल मीडियावरून विविध प्रकारे प्रमोशन करता येते. जसे फेसबुक वरून विविध लिंक्स, फोटोज-व्हिडीओज शिवाय कितीही मोठे लेख प्रमोट करू शकतो. या उलट ट्विटर वरून छोट्यात छोटा मजकूर व फोटोज- व्हिडीओज प्रमोट करता येतात. तसेच लिंक्डइन वर प्रोफेशनल अर्थात कामासाठी आलेल्या लोकांना टार्गेट करणे सोपे असते तर इंस्टाग्राम वर कॅज्युअल अर्थात मनोरंजनासाठी आलेल्या लोकांना टार्गेट करणे सोपे असते.

त्यामुळे पेड प्रमोशन करताना वरील तीन गोष्टींनुसार योग्य ते सोशल मीडिया निवडावे.

सुरुवातीला केवळ एकाच सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करून त्यामध्ये पारंगत झाल्यावर पुढच्या सोशल मीडियाकडे वळावे.

– शैवाली बर्वे
(shaivalibarve@gmail.com)


महाराष्ट्र उद्योजकसूची मध्ये तुमची नोंद केली आहे ना?

नसल्यास आताच खालील लिंक वर Click करा!

Register : https://shop.udyojak.org/product/001/