‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाची ओळख :

एप्रिल २०१५ पासून हे मासिक सुरू आहे. मासिकात उद्योग सुरू करण्यापासून तो कसा वाढवावा, उद्योग-व्यवसायात यशस्वी कसे व्हावे अशी बरीच माहिती असते. त्याशिवाय इतर उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा असतात.

कामाचे स्वरूप :

‘स्मार्ट उद्योजक’ प्रतिनिधी / पार्टनर / affiliate होऊन तुम्ही इतरांना ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाबद्दल माहिती द्यायची व त्यातून जे मासिकाचे वर्गणीदार होतील, त्याचे तुम्हाला कमिशन मिळेल. मासिकाच्या वर्गणीसोबत पुस्तके आणि जाहिरातीही विकता येतील.

स्मार्ट उद्योजक प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे घरबसल्या ऑनलाइन करू शकता तसेच प्रत्यक्ष लोकांना भेटून करू शकता. लोकांना ऑनलाइन किंवा थेट भेटून किंवा फोनवर बोलून स्मार्ट उद्योजक मासिकाची माहिती द्या. वर्गणीदार होण्याची प्रक्रिया सांगा आणि वर्गणीदार करून घ्या.

पुस्तकविक्रीचीही हीच प्रक्रिया आहे. तुम्ही लोकांना ऑनलाइन लिंक पाठवून ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय देऊ शकता किंवा प्रत्यक्ष भेटून पुस्तके विकू शकता.

Affiliate लिंक कशी तयार करायची?

आम्ही तुम्हाला WhatsApp वर जाहिराती पाठवतो. त्या जाहिरातींना फक्त तुमचा पार्टनर id जोडला की तुमची पार्टनर लिंक तयार होते.

तुमच्या पार्टनर लिंकवर कोणी क्लिक केले की त्यांच्या सिस्टिममध्ये एक कुकी save होते. ही लिंक पुढील ३० दिवस active असते. या ३० दिवसांत त्या ग्राहकाने स्मार्ट उद्योजक शॉपवरून काहीही खरेदी केले की ऑटोमॅटिक त्याचे कमीशन तुमच्या खात्यात जोडले जाते. तुमच्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही हे कमीशन पाहू शकता.

पार्टनर ID जोडून लिंक तयार करण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

मार्केटिंग

Affiliate Marketing या नावातच मार्केटिंग येतं, त्यामुळे मार्केटिंग हा यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही स्वतःची पार्टनर लिंक तयार करायला शिकलात मात्र त्याचे तुम्हाला मार्केटिंग करता येत नसेल तर याच काहीच फायदा होणार नाही.

संभाव्य वर्गणीदारांची यादी तयार करा
फक्त ₹२२२ मध्ये आपण वर्गणीदारांना अनेक गोष्टी देतोय ज्याने त्यांना unlimited लाभच होणार आहे. त्यामुळे तुमच्या परिचयातील जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येण्यासाठी त्यांची यादी तयार करा व त्यांना वर्गणीदार होण्यासाठी उद्युक्त करा.
तुम्ही तयार केलेल्या यादीतील लोकांना तुम्ही WhatsApp, Facebook द्वारे किंवा प्रत्यक्ष फोन करून सांगू शकता.
लक्षात घ्या, एका वर्गणीदारामागे ₹१०० कमीशन आहे, त्यामुळे दिवसाला कमीतकमी एक तरी वर्गणीदार होईल, असे लक्ष्य ठेवा.

अपरिचितांपर्यंत पोहोचा : बरेच पार्टनर्स असं सांगतात की सुरुवातीला परिचितांपैकी काही जण वर्गणीदार झाले आता आम्ही नवीन वर्गणीदार कसे जोडायचे?

यावर उपाय एकच आहे अपरिचितांपर्यंत पोहोचा.

विक्रीशास्त्राचा मूलभूत नियम आहे की अधिकाधिक विक्री आणि नफा हा अपरिचित मार्केटमधूनच होतो. प्रत्येकाला परिचित लोकांची एक मर्यादा असते. कोणी ५०-१०० तर ७००-८०० या पलीकडे परिचितांची संख्या नसते, त्यामुळे मार्केटिंग आपल्याला नेहमी अपरिचितांमध्येच करावी लागते.

सोशल मीडियाचा वापर :

सोशल मीडिया हे यासाठी उत्तम माध्यम आहे. घरबसल्या तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम, WhatsApp इत्यादी माध्यमांचा वापर करून दोन वर्गणीदार सहज मिळवू शकता.
फेसबुकवर अनेक प्रकारचे ग्रुप्स असतात. त्या ग्रुपचा वापर करू शकता. त्यावर आपली जाहिरात पोस्ट करू शकता.
WhatsApp, टेलिग्रामवरही अनेक ग्रुप्स असतात, त्यात जोडले जाऊन त्यातही जाहिरात पोस्ट करू शकता.